LATEST NEWS
Home National कारगिल विजय दिवसानिमित्त आष्टी येथे वीर जवानांना आदरांजली   – अंकुश खोटे

कारगिल विजय दिवसानिमित्त आष्टी येथे वीर जवानांना आदरांजली   – अंकुश खोटे

0
कारगिल विजय दिवसानिमित्त आष्टी येथे वीर जवानांना आदरांजली   – अंकुश खोटे

 

शौर्याचा सन्मान आष्टीत कारगिल विजय

आष्टी (२६ जुलै) BM NEWS

बबन दहिफळे

– कारगिल विजय दिनानिमित्त आष्टी येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिद सैनिक संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश खोटे आणि आष्टी तालुकाध्यक्ष नवनाथ भगत यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहीद जवानांच्या बलिदानास विनम्र अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमात परिसरातील शाळांचे विद्यार्थी, आजी-माजी आमदार, आजी-माजी सरपंच, तसेच आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीची जाणीव वाढवणारा आणि युवकांमध्ये देशसेवेची प्रेरणा देणारा ठरणार आहे.

या आयोजनाच्या माध्यमातून जवानांच्या पराक्रमाची आठवण करून देत त्यांच्या कुटुंबीयांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. देशभक्तीपर गीतं, भाषणं आणि शौर्यगाथांचा समावेश असलेला कार्यक्रम बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात होणार असून तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व  नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आणि युद्धामध्ये शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here