अहमदपूर (जि. लातूर) –BM NEWS REPORTER
एकेकाळी शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांक गाठणाऱ्या महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूरने सलग ७ वेळा महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला होता. मात्र गेल्या काही वर्षांत या महाविद्यालयाच्या गुणवत्तेमध्ये झपाट्याने घसरण होत असल्याचे चित्र समोर येत आहे. 
विद्यार्थीसंख्या घट, कमकुवत शैक्षणिक निकाल, सुसंवादाचा अभाव, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांमध्ये सहभागाची कमतरता – या बाबी संस्थेच्या शैक्षणिक पतावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
—
गुणवत्ता घसरणीची प्रमुख कारणे:
कर्मचाऱ्यांचा संस्थेशी भावनिक तुटवडा
संस्थेतील अंतर्गत राजकारण व गटबाजी
विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
गुणवत्तेपेक्षा आर्थिक निकषावर पदभरती
शैक्षणिक उपक्रमांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अभाव
पालक व माजी विद्यार्थ्यांचा संस्थेशी संवाद तुटलेला
- स्वतः वर विश्वास नसलेला प्राध्यापक वर्ग व अंतर्गत गटबाजी

—
️ संस्था गुणवत्ता वाढीसाठी काय करू शकते?
✅ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना संस्थेत प्रवेश सक्तीचा करावा
– संस्थेतील प्रत्येक कर्मचारी आपली जबाबदारी अधिक गंभीरतेने घेईल.
✅ विद्यार्थी कल्याण केंद्र सक्रिय करावे
– विद्यार्थ्यांच्या अडचणी, मागण्या आणि संवादासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक.
✅ गुणवत्ताधारित मूल्यांकन प्रणाली सुरू करावी
– शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेचे परीक्षण नियमितपणे करावे.
✅
बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षण अधिक प्रभावी करणे आवश्यक.
✅ उच्च शिक्षण संस्थांशी MoU (करारनामा) करून प्रकल्प व इंटर्नशिप संधी वाढवाव्यात.
संस्थेच्या वैभवशाली परंपरेला पुनरुज्जीवित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि प्रशासन एकत्र आले तर “गुणवत्ता ही पुन्हा उच्चांक गाठू शकते!”

✍️